spot_img
spot_img
spot_img
spot_img

माजलगाव परिसर चे संस्थापक संपादक प्रदीप कुलकर्णी यांचा वाढदिवस शाश्वती अर्बन मध्ये साजरा

माजलगाव (प्रतिनिधी)- येथील लोकप्रिय साप्ताहिक माजलगाव परिसरचे संस्थापक संपादक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रदीप कुलकर्णी यांचा 64 वा वाढदिवस शाश्वती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या कार्यालयात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्वारका अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे चेअरमन दिगंबर सोळंके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शरद यादव, सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ तथा नगरसेवक डॉक्टर सचिन देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे मंडळ शहर अध्यक्ष विनायक मामा रत्नपारखी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले.
त्यानंतर प्रदीप कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त येथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी प्रदीप कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील कार्याचा आणि साहित्य लेखनाच्या कार्याचा उल्लेखनीय असा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजलगाव परिसर चे उपसंपादक तथा सेवानिवृत्त अध्यापक रवींद्र सोनवळकर यांनी केले.
या कार्यक्रमास सुनील वैद्य, डॉक्टर पोहनेरकर, सेवानिवृत्त अध्यापक रवी कुलकर्णी, गायकवाड कोचिंग क्लासेस चे भगवान गायकवाड सर युवा नेते बालाप्रसाद नाटकर तांदळे, श्री मंगलनाथ मल्टीस्टेट मुख्य शाखेचे शाखा अधिकारी रुपेश पांचाळ, किरण काटवटे, श्री दलाल, यांच्यासह शाश्वती अर्बनचे अनेक ठेवीदार खातेदार सभासद व प्रदीप कुलकर्णी यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रदीप कुलकर्णी यांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. आणि सकारात्मक पत्रकारिता करण्यासाठी जो एक धडा त्यांना त्यांच्या तरुणपणी मिळाला तो धडा त्यांनी उपस्थितांना ऐकवला. भविष्यात पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवास याचा योग्य समन्वय ठेवून चांगले काम करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या 25 कादंबऱ्या लिहून पूर्ण झाल्या असून त्यातील दोन पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत बाकी कादंबऱ्या ऑनलाईन वाचायला मिळतात. बदलत्या युगाबरोबर आपणही बदलले पाहिजे म्हणून ऑनलाईन लिहिणे आणि ऑनलाईन वाचक मिळवणे हे महत्त्वाचे आहे त्यामुळे ऑफलाइन तर आपण आतापर्यंत लिहिलेच आहे पण ते ऑनलाईन प्रसिद्ध करून लोकांना जे अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि लोकांना तो आवडला याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
शाश्वती अर्बनने कार्यक्रम ठेवला आणि सन्मान केला याबद्दल त्यांनी संस्थेचे मनापासून आभार मानले आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, फोनवर शुभेच्छा दिल्या तसेच समक्ष ज्यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे त्यांनी या निमित्ताने मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाश्वती अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष काटकर, शाखा अधिकारी कृष्णा थोरात, प्रशांत वाडकर, देशमाने यांनी परिश्रम घेतले.
त्याचबरोबर शाश्वती अर्बनचे चेअरमन यांनी यावेळी आभार प्रदर्शन करताना आपल्या मोठ्या बंधू बद्दल भावना व्यक्त केल्या त्यावेळी त्यांचे हृदय अनेक भावनांनी उचंबळून आले होते. त्यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.
एकंदर कार्यक्रम खूप छान सुंदर आणि नेटका पार पडला.
शेवटी चहापाना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

माजलगाव जलाशयातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर संयुक्त पथकाची मोठी कारवाई; ३५० मोटारी व ५० सोलर पॅनेल हटवले

बीड: दि,11: माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात १० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून मोठी...

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा :संभाजी गायकवाड

बीड/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड शहरात शुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!