बीड/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड शहरात शुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली खालील मागण्याची शासन दरबारी पूर्तता करण्यासाठी विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
राज्यासह मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा व मोल मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी राज्यभर दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ जन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये मदत देण्यात यावी. शेतमजूर, कामगार व मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबियांना 50 हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी. अनु जातीमधील 59 जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी. कसत असलेल्या 2011 पर्यंतच्या गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी.आदी मागण्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरात दि. 16 ऑक्टोबर 2026 शुक्रवार रोजी होणाऱ्या
विराट जाहीर सभेस बीड जिल्ह्यातील रिपाइं पदाधिकारी, महिला गायरान धारक, विद्यार्थी, शेतमजूर यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संभाजी गायकवाड, अविनाश जोगदंड, विलास जोगदंड, प्रभाकर चांदणे, नागेश आण्णा दुबळे, अक्षय कोकाटे, के. के. कांबळे, रतन वाघमारे, पप्पू वाघमारे, सन्नी जोगदंड, अमोल मिटकर, लखन जाधव, विजय डोळस, अभिषेक जोजारे, रोहित गायकवाड, करण वाघमारे, अशोक भाले, राम पवार, तुषार गायकवाड, साईनाथ जाधव, रोहित डोंगरे, कृष्णा वैष्णव, आकाश वाघमारे, आरशान शेख, विशाल माने, रितेश गुंजाळ ओमकार गायकवाड, ए. एच. गायकवाड, परसराम जाधव, महेश काळे आदिनी केले आहे.




